Menu Close

गजानन बावन्नी – Gajanan Bavanni Lyrics in Marathi

Shri Gajanan Bavanni
Shri Gajanan Maharaj

If you are looking for Gajanan Bavanni Lyrics in Marathi then here it is.

गजानन बावन्नी – Gajanan Bavanni

|| गण गण गणात बोते ||

जय सद्गुरू गजानन । रक्षक तुची भक्तजना ।।१।।

निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात गजानन तू ।।२।।

सदेह तू परि विदेह तू । देह असुनि देहातीत तू ।।३।।

माघ वद्य सप्तमी दिनी । शेगावात प्रगतोनी ।।४।।

उष्ट्या पत्रावळी निमित्त । विदेहत्व तव हो प्रगत ।।५।।

बंकट लालावरी तुझी । कृपा जाहली ती साची ।।६।।

गोसाव्याच्या नवसासाठी । गांजा घेसी लावुनी ओठी ।।७।।

तव पदतीर्थे वाचविला । जानराव तो भक्त भला ।।८।।

जनाकीरामा चिंचवणे । नासवुनी स्वरूपी आणणे ।।९।।

मुकीन चंदुचे कानवले । खावूनी कृतार्थ त्या केले ।।१०।।

विहिरीमाजी जलविहिना । केले देवा जलभारणा ।।११।।

मधमाश्यांचे डंक तुवा । सहन सुखे केले देवा ।।१२।।

त्यांचे काटे योगबले । काढुनी सहजी दाखविले ।।१३।।

कुस्ती हरिशी खेळोनी । शक्ती दर्शन घडावोनी ।।१४।।

वेद म्हणूनी दाखविला । चकित द्रविड ब्राम्हण झाला ।।१५।।

जळत्या पर्यकावरती । ब्राम्ह्गीरीला ये प्रचिती ।।१६।।

टाकळीकर हरिदासाचा । अश्र्व शांत केला साचा ।।१७।।

बाळकृष्ण बाळापूरचा । समर्थ भक्तचि जो होता ।।१८।।

रामदासरूपे त्याला । दर्शन देवुनि तोषविला ।।१९।।

सुकलालाची गोमाता । द्वाड बहू होती ताता ।।२०।।

कृपा तुझी होतांच क्षणी । शांत जाहली ती जननी ।।२१।।

घुडे लक्ष्मण शेगांवी । येता व्याधी तू निरवी ।।२२।।

दांभिकता परि ती त्याची । तू न चालवुनि घे साची ।।२३।।

भास्कर पाटील तव भक्त । उद्धरलासी तू त्वरित ।।२४।।

आज्ञा तव शिरसा वंद्य । काकही मानती तुज वंद्य ।।२५।।

विहिरीमाजी रक्षियला । देवा तू गणु जवऱ्याला ।।२६।।

पीतांबराकरवी लीला । वठला आंबा पल्लविला ।।२७।।

सुबुद्धी देशी जोशाला । माफ करी तो दंडाला ।।२८।।

सबडद येथील गंगाभारती । थुंकूनी वारिली रक्तपिती ।।२९।।

पुंडलिकाचे गडांतर । निष्ठा जाणुनी केले दूर ।।३०।।

ओंकारेश्वरी फुटली नौका । तारी नर्मदा क्षणात एका ।।३१।।

माधवनाथा समवेत । केले भोजन अदृष्ट ।।३२।।

लोकमान्य त्या टिळकांना । प्रसाद तूचि पाठविला ।।३३।।

कवर सुताची कांदाभाकर । भाक्षिलीस त्या प्रेमाखातर ।।३४।।

नग्न बैसुनी गाडीत । लीला दाविली विपरीत ।।३५।।

बायजे चित्ती तव भक्ती । पुंडलीकावर विरक्त प्रीती ।।३६।।

बापुना मनी विठ्ठल भक्ती । स्वये होशी तू विठ्ठल मूर्ती ।।३७।।

कवठ्ठ्याच्या त्या वारकऱ्याला । मरीपासून वाचविला ।।३८।।

वासुदेव यति तुज भेटे । प्रेमाची ती खुन पटे ।।३९।।

उद्धट झाला हवालदार । भस्मीभूत झाले घरदार ।।४०।।

देहातांच्या नंतरही । किती जणा अनुभव येई ।।४१।।

पडत्या मजुरा शेलियले । बघती जन आश्चर्ये भले ।।४२।।

अंगावरती खांब पडे । स्त्री वांचे आश्चर्य घडे ।।४३।।

गजाननाच्या अद्भुत लीला । अनुभवा येती आज मितीला ।।४४।।

शरण जाऊनी गजानना । दुखं तयाते करि कथना ।।४५।।

कृपा करी तो भक्तांसी । धावुनी येतो वेगेसी ।।४६।।

गजाननाची बावन्नी । नित्य असावी ध्यानीमनी ।।४७।।

बावन्न गुरुवारा नम । करा पाठ बहु भक्तीने ।।४८।।

विघ्ने सारी पळती दूर । सर्व सुखांचा येई पूर ।।४९।।

चिंता साऱ्या दूर करी । संकटातुनी पार करी ।।५०।।

सदाचार रत सदभक्ता । फळ लाभे बघता बघता ।।५१।।

सुरेश बोले जय बोला । गजाननाची जय बोला ।।५२।।

जय बोला हो जय बोला । गजाननाची जय बोला ।।५३।।

।। अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधीराज योगीराज परब्रम्ह सद्चीदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज कि जय ।।

गजानन बावन्नी on Youtube


इस वेबसाइट पर चालीसा/आरती/स्तोत्र सिर्फ भक्ति को ध्यान में रखते हुए दिया गया है. इसके द्वारा हम किसी भी तरह से इस पर हक्क नहीं जता रहे. इसका असली हक इसके असली लेखक/कवी का ही रहेगा.

Simlar Posts
श्री गजानन महाराजांची आरती – Shri Gajanan Maharaj Aarti Lyrics in Marathi